IHRA News

IHRA Live News

सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून कुडाळमध्ये पाणी बोरिंगची स्वच्छता

सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून कुडाळमध्ये पाणी बोरिंगची स्वच्छता जावळी तालुका प्रतिनिधी सुनिल भोसले दि. 24 कुडाळ येथे सातारा जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री विरेंद्र शिंदे यांनी इंदिरानगर येथील बोरीग स्वच्छ करून घेतली आहे.कधी काळी कुडाळ गावातील पाणी पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यावर गावातील बोरीगच्या माध्यमातून लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने गावातील इंदिरानगर येथील बोरीग काँप्रेसर मशीनच्या माध्यमातून स्वच्छ करून घेण्यात आली आहे. तसेच टिसेलचा वापर करून पाणी शुध्दीकरण करण्यात आले असून येथील चारशे ते पाचशे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे. यामुळे येथील आबालवृद्ध व महिला मंडळातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशाच पद्धतीने पंचक्रोशीतील व तालुक्यातील बोरिंग स्वच्छ व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

0Shares
error: Content is protected !!