*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
*9820375869*
🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी*
💠 *अध्याय सहावा*
🍀 *ध्यान योग*
🌱 *ओवी २११ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
*🌳प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिवरते स्थितः|मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः॥६-१४॥*
अर्थ 👉 _अंत:करण शांत असलेला, भीतिरहित, ब्रह्मचर्यव्रत पालन करणारा, माझे ठिकाणी चित्त ठेवणारा, मत्परायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे_
कुंडलिनी जागृती दृश्यकथा
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻ऐसी शरीराबाहेरलीकडे।अभ्यासाची पांखर पडे।तंव आंतु त्राय मोडे।मनोधर्माची॥२११॥*
अशा रितीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरु झाला, म्हणजे आंत मनाच्या धर्माचे बळ नाहींसे होते.
*🌻कल्पना निमे ।प्रवृत्ती शमे ।आंग मन विरमे ।सावियाचि ॥२१२॥*
ते मनोधर्म कोणते ते ऐक. कल्पना खुंटतें ,मनाची हाव कमी होते, आणि मनोविकार आपोआप बंद पडतात,
*🌻क्षुधा काय जाहाली ।निद्रा केउती गेली ।हे आठवणही हारपली ।न दिसे वेगां ॥२१३॥*
भुक काय झाली, व झोप कोणीकडे गेली ह्यांची आठवण नाहींशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही.
*🌻जो मुळबंधे कोंडला ।अपानु माघौता मुरडला ।तो सवेंचि वरी सांकडला ।फुगु धरी ॥२१४॥*
मूलबंधानें कोंडलेला अपानवायु माघारी फिरला, म्हणजे सहज वर अडकुन फुगा धरतो.
*🌻क्षोभलेपणें माजे ।उवाइला ठायी गाजे ।मणिपुरेंसी झुंजे।राहोनियां॥२१५॥*
तो क्षोभून बलवत्तर होतो, अडकलेल्या जागी गुरगुरतो, आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारीतो.
*🌻मग थांवली ते वाहटुळी ।सैंघ घेऊनि घर डहुळी ।बाळपणींची कुहीटुळी ।बाहेर घाली ॥२१६॥*
मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहोंकडे पोटांत फिरून ढवळाढवळ करिते, आणि बालपणापासून सांचलेली कुजकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करिते.
*🌻भीतरीं वळी नधरे।कोठ्यामाजीं संचरे।कफपित्ताचे थारे। उरोंनेदी ॥२१७|।*
तो वायु पोटांत तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो, आणि कफपित्तांचा नाश करितो,
*🌻धांतुचे समुद्र उलंडी।मेदाचे पर्वत फोडी।आंतली मज्जा काढी।अस्थिगत||२१८॥*
सप्त धातूंची स्थानें ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो, आणि हाडांतील रस बाहेर काढतो.
*🌻नाडीतें सोडवी।गात्रांतें विघडवी साधकांते भेडसावी।परि बिहावें ना॥२१९*
नाड्या सोडवतो,अवयवांना शिथिल करतो आणि योगसाधन करणाराला भिती घालतो; परंतु त्याने भिऊं नये.
*🌻व्याधीतें दावी ।सवेंचि हरवी ।आप पृथ्वी कालवी ।एकवाट ॥२२०॥*
तो व्याधी उत्पन्न करतो,आणि लागलीच नाहींशी करतो, व कफ वैगेरे ओलसर पदार्थ आणि मांस वैगेरे जड पदार्थ एकत्र करतो.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🍍 *ओवी२२१ पासून उद्या*
🍍 *|जयजय रामकृष्ण हरि|*
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ