1 min read Main ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे9820375869🍀 सार्थ ज्ञानेश्वरी💠 अध्याय सहावा🍀 ध्यान योग🌱 ओवी २११ पासून⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌳प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिवरते स्थितः|मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः॥६-१४॥अर्थ 👉 अंत:करण शांत असलेला, भीतिरहित, ब्रह्मचर्यव्रत पालन करणारा, माझे ठिकाणी चित्त ठेवणारा, मत्परायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावेकुंडलिनी जागृती दृश्यकथा➖➖➖➖🚩➖➖➖➖🌻ऐसी शरीराबाहेरलीकडे।अभ्यासाची पांखर पडे।तंव आंतु त्राय मोडे।मनोधर्माची॥२११॥ अशा रितीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरु झाला, म्हणजे आंत मनाच्या धर्माचे बळ नाहींसे होते.🌻कल्पना निमे ।प्रवृत्ती शमे ।आंग मन विरमे ।सावियाचि ॥२१२॥ ते मनोधर्म कोणते ते ऐक. कल्पना खुंटतें ,मनाची हाव कमी होते, आणि मनोविकार आपोआप बंद पडतात,🌻क्षुधा काय जाहाली ।निद्रा केउती गेली ।हे आठवणही हारपली ।न दिसे वेगां ॥२१३॥ भुक काय झाली, व झोप कोणीकडे गेली ह्यांची आठवण नाहींशी होऊन त्यांचा पत्ता देखील लागत नाही.🌻जो मुळबंधे कोंडला ।अपानु माघौता मुरडला ।तो सवेंचि वरी सांकडला ।फुगु धरी ॥२१४॥ मूलबंधानें कोंडलेला अपानवायु माघारी फिरला, म्हणजे सहज वर अडकुन फुगा धरतो.🌻क्षोभलेपणें माजे ।उवाइला ठायी गाजे ।मणिपुरेंसी झुंजे।राहोनियां॥२१५॥ तो क्षोभून बलवत्तर होतो, अडकलेल्या जागी गुरगुरतो, आणि राहून राहून लिंगचक्राशी धडका मारीतो.🌻मग थांवली ते वाहटुळी ।सैंघ घेऊनि घर डहुळी ।बाळपणींची कुहीटुळी ।बाहेर घाली ॥२१६॥ मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहोंकडे पोटांत फिरून ढवळाढवळ करिते, आणि बालपणापासून सांचलेली कुजकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करिते.🌻भीतरीं वळी नधरे।कोठ्यामाजीं संचरे।कफपित्ताचे थारे। उरोंनेदी ॥२१७|। तो वायु पोटांत तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो, आणि कफपित्तांचा नाश करितो,🌻धांतुचे समुद्र उलंडी।मेदाचे पर्वत फोडी।आंतली मज्जा काढी।अस्थिगत||२१८॥ सप्त धातूंची स्थानें ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो, आणि हाडांतील रस बाहेर काढतो.🌻नाडीतें सोडवी।गात्रांतें विघडवी साधकांते भेडसावी।परि बिहावें ना॥२१९ नाड्या सोडवतो,अवयवांना शिथिल करतो आणि योगसाधन करणाराला भिती घालतो; परंतु त्याने भिऊं नये.🌻व्याधीतें दावी ।सवेंचि हरवी ।आप पृथ्वी कालवी ।एकवाट ॥२२०॥ तो व्याधी उत्पन्न करतो,आणि लागलीच नाहींशी करतो, व कफ वैगेरे ओलसर पदार्थ आणि मांस वैगेरे जड पदार्थ एकत्र करतो.⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳🍍 ओवी२२१ पासून उद्या🍍 |जयजय रामकृष्ण हरि| December 21, 2021 Arun Rajpure *ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे* *9820375869* 🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी* 💠 *अध्याय सहावा* 🍀 *ध्यान...