IHRA News

IHRA Live News

जावळीत अाता बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया;अा.शशिकांत शिंदे

जावळीत अाता बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया;अा.शशिकांत शिंदे

कदिर मणेर/सातारा प्रतिनिधी
मोरखिंड ता जावली येथील विविध विकास कामाच्या उध्दघाटनाप्रसंगी अा.शशिकांत शिंदे यांची तुफान फटकेबाजी अा.शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव न घेता अा.शशिकांत शिंदे यांनी केली विरोधकांना खिंडीत गाठण्याची भाषा.अा.शशिकांत शिंदे म्हणाले,अाम्ही राजे नसलो तरी जनतेच्या मनातील खरे ‘राजे’, ते पुढे म्हणाले, मी एवढच सांगेन काही लोक भाषणामध्ये उल्लेख करतात, मी काही कुणाला अाव्हान नाही देणार ,मी साधा माणूस अाहे.काही लोक थंड करण्याची भाषा करतात, काही लोक संपवण्याची भाषा करतात.दुसर्याला संपवण्याच्या नादात स्वत: संपू नका.काही लोकांना ज्यांना मी मोठे केले तुम्हा मुंबईकर लोकांना माहीती अाहे. त्यांना वाटू लागल अाम्ही मोठे झालो. ज्यांना वाढवले त्यांनी राजकारणात स्वत:ची काळजी घ्यावी.
तुम्ही अाम्ही जावळीचे सुपूत्र अाहोत मला खात्री अाहे,जावळीतला माणुस इतका पक्का असतो, तो जावलीच्या माणसाला डोक्यावर घेवून पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करेल.असेही अा.शिंदे म्हणाले.

0Shares
error: Content is protected !!