IHRA News

IHRA Live News

पुणे येथे पत्नीची गळा आवळून हत्या

दिनांक : 18 डिसेंबर 2022

पुणे प्रतिनिधि : कल्याणी मोरे

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या पत्नीची पतीने गळा आवळून हत्या धक्कादायक घटना घडली आहे. ताथवडे परिसरातील ओयो टाऊन हाऊस (OYO Town House) हॉटेलच्या रूम नंबर (301) मध्ये ही घटना घडली आहे. हेमंत अशोक मोहिते या तरुणाने आपली पत्नी सपना अशोक गवारे हिचा हॉटेलच्या रूममध्ये स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आहे
सपना, ही पुण्यात (Pune) स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, त्यादरम्यान तिचं मॅट्रिमोनिअल साईटच्या माध्यमातून कराडचा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हेमंत मोहिते यांच्याशी ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात !
त्यामुळे 28 ऑक्टोंबर 2021 ला सपना आणि हेमंत ने आळंदी येथे घरच्यां लोकांच्या परवानगी शिवाय लग्न केलं होतं. मात्र, सपनाच्या घरच्यांना या लग्नाला विरोध असल्याने तिच्या घरच्यांनी तिला हेमंतशी फारकत घ्यायला सांगितली होत. तरीदेखील सपना हेमंतला भेटायची, ते मागील काही दिवसांपसून वेगवेगळ्या हॉटेल आणि लॉज मध्ये वास्तव्यास होते. मात्र काल ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये वास्तव्यास असतांना हेमंत आणि सपनात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणातून हेमंत ने सपनांचा स्कार्फच्या सहाय्याने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणात सपनाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी हेमंत मोहिते विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे.

0Shares
error: Content is protected !!