वर्धा२९ :- प्रतिनिधी /दिपाली चौहान
जुन्या वैमनस्यातून वर्धा शहरातील गोंडप्लॉट परिसरात धारदार शास्त्राने किमान १५ ते २० वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. मनोज मुकुंद धानोरकर (३२) रा. केळकरवाडी असे मृत दारूविक्रेत्याचे नाव आहे.
मृतक मनोज धानोरकर याने घराच्या अवघ्या काही अंतरावर किरायाने खोली घेतली होती. त्या खोलीतून तो दारूविक्रीचा व्यवसाय करीत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास मनोजच्या पत्नीने त्याला फोन करून जेवण करण्यास येण्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोजचा कुणाशीतरी वाद सुरू असल्याने त्याचा आवाज मनोजच्या पत्नीला फोनवर ऐकू आला. मनोजच्या पत्नीने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली असता मनोज रक्ताने भिजून जमिनीवर पडला असल्याचे दिसून आले. या बाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मनोजला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. तेथून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले.मृत मनोज धानोरकर हा गुंडगिरी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर शहर ठाण्यात जीवे मारण्याचा हल्ला, जबर मारहाण इतकेच नाही तर तो त्याच्या घरा जवळील लोकांना सुद्धा अतिशय त्रास द्यायचा, अर्ध्या रात्री दारू पिऊन तमाशा करायचा ,धमक्या द्यायचा,आदीसह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. तो किरायाने घेतलेल्या खोलीतून दारूविक्री करायचा. त्याच खोलीत शनिवारी मध्यरात्री त्याचा सहा जणांनी गेम केला. आरोपी आकाश जयस्वाल हा देखील दारूविक्रेता असल्याचे सूत्रांनी सांगितले.मृतक अन् आरोपी दोघेही दारूविक्रेते होते.मृत मनोज धानोरकर आणि आरोपी आकाश जयस्वाल यांच्यात जुना वाद होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मृतक मनोज याने आकाश जयस्वाल याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याचा वचपा काढण्यासाठी आकाश जयस्वाल याने मनोजची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
मृतक मनोज हा मध्यरात्रीच्या सुमारास अड्ड्यावर असतानाच आरोपी आकाश जयस्वाल आणि त्याच्या मित्रांनी मनोजवर हल्ला चढविला. मनोजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या हनुवटी, मान, पाठ, आदी ठिकाणी सुमारे १५ ते २० वेळा तीव्र वार करून मनोजचा कोथळाच बाहेर काढला.
याप्रकरणी मनोजची पत्नी कोमल मनोज धानोरकर असून पोलीस आरोपींचा शोध घेत यांच्यासह शोध धानोरकर रा. केळकरवाडी हिने शहर आहेत. घटनास्थळी उपविभागीय सुरू केले. घटनास्थळी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पोलीस अधिकारी पीयूष जगताप, ठसे तज्ज्ञांनाही याप्रकरणी आकाश जयस्वाल याला ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी भेट दिली .तसेच पोलीस उपनिरीक्षक
मोहन धोंगडे, नरेंद्र कांबळे, यांच्यासह पथकाने तपास सुरू केले.
सायंकाळी चेतन जुमडे, प्रीतिजन अशोक मडावी,यांना ही अटक करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ