*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
*9820375869*
🌿 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *अध्याय ४था*
🌿 *ज्ञानकर्मसंन्यासयोग*
🌲 *ओवी १५८ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
*श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परंतप |सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते||४-३३||*
अर्थ 👉 _हे शत्रुतापना, द्रव्यसाधनाने साध्य होणार्या यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचा ज्ञानामधे अंतर्भाव होतो._
( ज्ञानयज्ञ श्रेष्ठ)
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌿अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जयां नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख ॥१५८॥*
अर्जुना! ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात क्रियांचा खटाटोप खूप आहे आणि त्यांचे पहिले फळ स्वर्ग आहे.
*🌷ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती ।दिनकरापाशीं ॥१५९॥*
ते द्रव्यादि यज्ञ आहेत खरे परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज नाहीसे होते, त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञाची बरोबरी करू शकत नाही.
*🌿देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जें न विसंबिती अंजन। उन्मेषनेत्रीं ॥१६०॥*
जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसुखरूप ठेवा मिळविण्याकरिता योगीजन रात्ररात्र जागे असतात,
*🌷जें धांवतया कर्माची लाणी। नैष्कर्म्यबोधाची खाणी।जें भुकेलिया धणी ।साधनाची ॥१६१¦*
जे ज्ञान आरंभिलेल्या कर्माचे प्राप्यस्थान आहे, जे ब्रह्मबोधाची खाण आहे व आत्मप्राप्तीकरीता भुकेलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे.
*🌿जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली।जेणें इंद्रिये विसरलीं ।इंद्रियसंगु ॥१६२॥*
ज्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती थांबली व तर्काची दृष्टी गेली आणि ज्या योगे इंद्रिये विषय सेवन करणे विसरली.
*🌷मनाचे मनपण गेलें ।जेथ बोलाचे बोलपण ठेलें ।जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसें ॥१६३॥*
ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले, जेथे शब्दांची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी ज्ञेय ब्रह्म व्यापलेले असते.
*🌿जेथ वैराग्याचा पांगु फिटे। विवेकाचाही सोसु तुटे।जेथ न पाहता सहज भेटे ।आपणपें ॥१६४॥*
ज्या ठिकाणी वैराग्याची कष्टप्रद स्थिती नाहीशी होते, विचारांची हाव नाहीशी होते, तेथे श्रमावाचून आपोआप आत्मज्ञान प्राप्त होते.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
🍡 *तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः |३४||*
अर्थ 👉 _आचार्यांकडे जाऊन प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे इत्यादी प्रकारांनी नम्रता आल्यावर, ते ज्ञानसंपन्न व तत्वदर्शी आचार्य त्या ज्ञानाचा उपदेश करील असे जाण_
( ज्ञानलाभ होण्यास काय करावे ?)
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥१६५॥*
असे जे *सर्वोत्कृष्ट ज्ञान, ते तुला मिळविण्याची इच्छा असेल तर, तू ब्रह्मज्ञान संपन्न असे जे संत त्यांची सर्व भावाने सेवा कर.*
*🌿जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा । तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥१६६॥*
ते *संत ज्ञानाचे घर* असून *सेवाधर्म हा त्या घराचा उंबरठा आहे.* तर अर्जुना! तू तिकडे वळून *सेवाधर्मरूपी हा उंबरठा आपल्या स्वाधीन करून घे.*
*🌷तरी तनुमनुजीवें ।चरणासी लागावें ।आणि अगर्वता करावें।दास्य सकळ ॥१६७॥*
एवढ्याकरता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी.
*🌿मग अपेक्षित जें आपुलें ।तेंही सांगती पुसिलें ।जेणे अंतःकरण बोधलें। संकल्पा न ये ॥१६८॥*
अशा प्रकारच्या सेवेने प्रसन्न झाल्यानंतर त्या प्रसन्नस्थितीत त्यांना शिष्यांनी जन्म_मरण, दु:खरूप संसार व निवृत्ती यांविषयी प्रश्न केला असता, ते ही कृपेने उपदेश करतात आणि उपदेशापासून होणाऱ्या बोधाचे ऐश्वर्य असे आहे की, त्या शिष्याचे अंतःकरणात संसाराची कल्पना पुन्हा येत नाही.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🌸 *ओवी १६९ पासून उद्या*
🌲 *¦जयजय रामकृष्ण हरि¦*
More Stories
जागतिक मानवाधिकार प्रशासन द्वारे १० डिसेंबर २०२३ रोजी जागतिक मानवाधिकार दिन कार्यक्रम संपन्न
प्रा. हरी नरके यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मंत्रालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पंचप्रण शपथ