IHRA News

IHRA Live News

छाया अनाथ, निराधार ,निराश्रित बालकांनी बनवलेल्या दिव्यांची सर्व नागरिकांनी व प्रशासकीय आधिकार्यांनी केली स्तुती


वर्धा६ :- प्रतिनिधी/ दिपाली चौहान

सगळी कडे आपल्या सर्वांना दीवाळीच्या सणाची रोशनाई चोहीकडे दिसते आहे.परंतु त्या रोषणाई आपल्याला दाखवणारी जी हाथ आहे ती काही प्रमाणात अनाथ बालकांचे चिमुकली हाथ आहे श्रीछाया बालगृहातील बालकांनी व तेथील प्रशिक्षण देणारी कर्मचारी यांनी मिळून किमान ५ हजार दिवे रंगवून त्याची प्रदर्शनी आपल्या बालगृहात लावली या बालगृहाच्या अध्यक्ष मा.डॉ.उषाताई फाले यांनीं या कार्याला शुभेच्छा दिल्या व बालकांच्या प्रत्येक प्रशिक्षणात त्या नेहमी उपस्थित असतात ,व अधीक्षक मा. श्री. स्वप्नील मानकर हयांनी सुद्धा या बालकांचा उत्साह वाढवला. हे प्रशिक्षण समुपदेशक दिपाली परमाल यांनी सर्व बालकांना दिले व त्यांचे सहकार्य सागर घाटे, आदेश राठोड, शैला दाते व सर्व कर्मचारी व बालकांनी मिळून पणत्या रंगवल्या. जेव्हा प्रदर्शनी बालगृहात लावण्यात आली तेंव्हा वर्धा नगरीतील सर्व नागरिकांचा खुप प्रतिसाद बालकांना व त्यांनी तयार केलेल्या पणत्यांना मिळाला व पणत्या अतिशय सुंदर बनल्या असे संबोधन दिले व या हयां मुलांनी इतरांच्या घरात प्रकाश दिला असे गौरव उदगार काढले नागरिकांनी पणत्या घेऊन मुलांचा उत्साह वाढवला, इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद वर्धा, मुख्य पोस्ट ऑफिस वर्धा व पोलिस अधीक्षक कार्यालय या कार्यालया तर्फे सुद्धा तिथे पणत्यांची प्रदर्शनी लावण्या करिता बालगृहाला आमंत्रित केले. व तिथे सुद्धा पोलिस अधीक्षक मा.होळकर साहेब, सरोज बावनकुळे मॅडम तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष मा. गाखरे मॅडम , गफाट साहेब व वर्धा पोस्ट ऑफीस चे सहाय्यक अधिक्षक श्री. मोहन निकम सर यांनी श्री छाया बालगृहातील अनाथ,निराधार बालकांची अतिशय स्तुती केली.पोलीस अधीक्षक मा. होळकर साहेब,व इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बालकानी बनविलेल्या पणत्या घेऊन बालकांच्या चेहऱ्यावर एक नवा आनंद आणून दिला.तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या मा.अध्यक्ष गाखरे मॅडम,शिक्षण व आरोग्य सभापती मा.माटे मॅडम ने देखील या बालकांचे अगदि मन भरून कौतुक करून पणत्या घेतल्या व तेथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच इतर सदस्यांनी सुद्धा बालकांची व श्री छाया बालगृहाची अतिशय स्तुती केली.

0Shares
error: Content is protected !!