IHRA News

IHRA Live News

संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

*ठाणे प्रतिनिधी श्री सचिन शिंदे*
🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *अध्याय ४था*
🍀 *ज्ञानकर्मसंन्यासयोग*
🔥 *ओवी ९३ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌴 *कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः |स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ||४-१८||*
अर्थ 👉  _कर्माचे ठिकाणी जो अकर्म पहातो आणि अकर्माचे ठिकाणी कर्म पहातो तो मनुष्यांमधे बुद्धिमान जाणावा व सर्वकर्मकर्ता जाणावा_
( कृतकृत्य पुरुषाचे लक्षण)
➖➖➖➖🍁➖➖➖➖
🌷 *जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता ।कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥९३॥*
     फळाची आशा न धरता जो कर्माचे आचरण करतो, पण ते कर्म आपण करतो असे मानत नाही.
🌷 *आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥ ९४ ॥*
     आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका समजलेला असतो की, त्याला आत्मस्वरूपाशिवाय जगात दुसरे काही उरत नाही व म्हणून कर्तव्य नाहीसे होते.
🌷 *परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी तो इहीं चिन्हीं जाणावा। ज्ञानिया गा ॥९५*
    तथापि लोकदृष्ट्या तो सगळी कर्मे नीट रीतीने आचरित आहे, असे दिसले तरी वरच्या लक्षणाने युक्त तोच ज्ञानी आहे.
🌷 *जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे । तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ॥९६॥*
    ज्याप्रमाणे एखादा माणूस नदीच्या काठावर उभा राहिल्यावर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहात असला तरी तो ‘पाण्याहून मी वेगळा आहे’, असे निःसंशय समजतो,
🌷 *अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें । तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥९७॥*
    अथवा नावेत बसून जाणाऱ्या मनुष्यास नदीच्या काठावरील झाडे धावतात असे दिसते, परंतु तो खरे पहातो व जाणतो ही की झाडे अचल आहेत.
🌷 *तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें । मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥९८॥*
    त्याचप्रमाणे सर्व कर्मे करीत असता आपल्या ठिकाणी कर्म प्रतीतीला येते ते अगदी खोटे असून मी कर्मकर्ता नाही, असे जो ओळखतो.
🌷 *आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसे न चलतां सूर्याचें चालणें। तैसें नैष्कर्म्यत्व जाणे।कर्मीचि असतां॥९९|*
    आणि सूर्य उगवतो आणि मावळतो एवढ्याच प्रमाणावरून तो चालतो, असे आपल्याला दिसते, तसे कर्म आचरित असता ते आपण करीत नाही असे जो जाणतो.
🌷 *तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे। जैसें जळीं जळामाजीं न बुडे। भानुबिंब ॥१००*
    तो मनुष्यासारखा जरी दिसतो, तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे, असे समजावे ज्याप्रमाणे सूर्याचे  प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य त्यात नसतो.
🌷 *तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले । न भोगितां भोगिलें ।भोग्यजात ॥१०१|*
    असा जो पुरुष, त्याने काही  पाहिले नाही, तरी सर्व विश्वच पाहिले. काही केले नाही तरी सर्व केले काही भोगले नाही,तरी यच्चयावत भोग भोगले.
🌷 *एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला । हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥१०२॥*
    तो एकच ठिकाणी बसला तरी सर्वत्र गमन त्यानेच केले. असो. फार  काय सांगावे, तो सर्व विश्वरूप बनला आहे.
➖➖➖➖🍁➖➖➖➖
🌴 *यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः |ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ||४-१९||*
अर्थ 👉  _ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व त्याचे कारण संकल्प यांनी विरहित असतात आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला लोक पंडित म्हणतात._
➖➖➖➖🍁➖➖➖➖
🌷 *जया पुरुषाचां ठायीं।कर्माचा तरी खेदु नाहीं।परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥१०३॥*
    ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही. परंतु कर्मफलाची इच्छा ज्याचे मनात मुळीच उद्भवत नाही.
🌷 *आणि हें कर्म मी करीन। अथवा आदरिले सिद्धी नेईन ।येणें संकल्पेंही जयाचें मन। विटाळेना॥१०४॥*
   आणि अमूक एक कर्म मी करीन अथवा अमूक कर्म सुरू केलेले शेवटास नेईन, असा संकल्प देखील ज्याचे मनास स्पर्श करीत नाही.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🚩 *ओवी १०५ पासून उद्या*
🚩 *¦¦जयजय रामकृष्णहरि¦¦*

0Shares
error: Content is protected !!