IHRA News

IHRA Live News

*जावली तालुक्यात दुर्गादेवींची विधिवत स्थापना*
*कुडाळ:प्रतिनिधी मंगेश भोसले*
जावली तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध असणारे कुसुंबी येथील काळुबाई या मंदिरात विधीवत पूजा करुन देवीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वत्र कोरोनाचे सर्व निर्बंध व सोशल डिस्टंसिंग पाळून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून जागतिक कोरोना महामारीमुळे सर्वत्र मंदिरे बंद असल्याने हजारो भाविक नाराज होते. परंतु नुकतेच महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे उघडण्याची परवानगी दिल्याने संपूर्ण भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच प्रामुख्याने जावली तालुक्यातील कुसुंबी, कुडाळ,हुमगाव,सलपाने,केळघर(वरोशी), म्हसवे व इतर सार्वजनिक ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आलेली आहे.

0Shares
error: Content is protected !!