IHRA News

IHRA Live News

प्रतिनिधी/दिपाली चौहान

सूत्रा द्वारे प्राप्त माहिती या प्रमाणे आहे की, फिर्यादी नामे हेमंत दादाजी नागपुरे, रा. वडनेर जि. वर्धा यांचे गुरूश्री ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवुन दिनांक०८/०७/२१ ते ०९/०७/२१ चे रात्री दरम्यान काही अज्ञात चोरटयांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील असा जु.की. २७६,६७०रू. चा माल चोरून नेला.त्याबाबत पो.स्टे. वडनेर येथे वरील गुन्हा नोंद असुन तपास सुरू आहे.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा द्वारे समांतर तपास करण्यात आला. प्रथमतः दि.२३/०८/२१ रोजी आरोपी डॉन सिंग दुधानी रा. झरी जिल्हा परभणी यास अटक करण्यात आली होती.
त्यानंतर आरोपी शिवासिंग विरसिंग शिकलकर रा.आंबिवली,ठाणे यास दि.२२/०९/२१ रोजी ठाणे येथून ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात आला. सदर तपास दरम्यान दि.२६/०९/२१ रोजी स्था. गु. शा. वर्धा व पो.स्टे. वडनेर येथील तपास पथक जालना व नांदेड येथे रवाना करण्यात आले होते. त्यांनी आरोपी सेवासिंग सिकंदरसिंग टाक (23)रा. नांदेड याला व आरोपी मनोहरसिंग भुत्यासिंग प्रेमसिंग टाक(२६) रा. जालना यांचे बाबत अत्यंत गुप्तता पाळून दोघांनाही नांदेड व जालना येथून एकाच वेळी अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सेवासिंग टाक याने दिलेल्या माहितीवरून नांदेड येथून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या माला पैकी ७३,९६८/- रु. चा माल हस्तगत करण्यात आला आहे.आरोपी सेवासिंग टाक यास कलम ४११,४१४भादंवि मनोहरसिंग टाक याला ४५७,३८० भादंवि अन्वये अटक करण्यात आली आहे.पुढील तपास नवनाथ मुंडे, पवन पन्नासे, अभिजित वाघमारे, अजु रिठे, रणजित फाले सायबर सेल चे अनुप कावळे, अंकित जिभे व पो. स्टे. शिवाजी नगर, नांदेड येथील पोलीस अंमलदार काकासाहेब जगताप, राजू डोंगरे यांनी केली आहे.

0Shares
error: Content is protected !!