IHRA News

IHRA Live News

ज्ञानेश्वरी यशोगाथा

🌲 *ठाणे, श्री सचिन शिंदे*
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
☘️ *विभूती योग*
🌸 *अध्याय दहावा*
☘️ *ओवी २४१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*_🎤🎶आॅडिओ सौ. पल्लवी राहूल नरखेडकर पुणे_*
➖➖➖➖🍧➖➖➖
*🌷धेनूंमध्यें कामधेनु । तें *मी म्हणेविष्वक्सेनु ।* जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥२४१॥*
     गायींमध्ये कामधेनू ती मी होय, असे भगवान म्हणतात. जन्म देणार्‍यांमध्ये मदन हा माझे स्वरूप जाण.
*🌷सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ॥२४२॥*
    अर्जुना! संपूर्ण सर्पकुळांमध्ये त्या कुळाचा अधिपती जो वासुकी तो मी आहे व सर्व नागामध्ये अनंत मी आहे.
*🌷अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥२४३॥*
    अर्जुना! जलात राहणार्‍या प्राण्यांमध्ये पश्चिमदिशारूपी स्त्रियेचा पती जो वरूण तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगू लागले.
*🌷आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वता । बोलत आहें ॥२४४॥*
    आणि सर्व पितरांच्या समुदायामधे अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे, हे मी खरे खरे सांगत आहे.
*🌷जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥२४५॥*
     जगाची शुभाशुभे, पुण्यपाप जे लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्याला अनुरूप जे भोगाचे नियमिते होतात म्हणजे कर्मानुरूप सुखदु:खाचा भोग देतात
*🌷तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ॥२४६॥*
    त्या निग्रहानुग्रह करणारांमधे जो यम, सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे. असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले.
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌻प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०॥*
अर्थ 👉 _दैत्यांपैकी प्रल्हाद मी आहे, हरण करणार्‍यात काल मी आहे, पशूंमधे सिंह मी आहे, पक्ष्यांमधे गरुड मी आहे._
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌷अगा दैत्यांचिया कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं । म्हणौनि दैत्यभावादिमेळीं । लिंपेचिना ॥२४७॥*
     अर्जुना! दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद मी आहे. पहा, म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता.
*🌷पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण ॥ २४८ ॥*
    श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना! गणना करणार्‍यांमध्ये महाकाळ मी आहे आणि वन्यपशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण.
*🌷पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥ २४९ ॥*
    सर्व पक्षीजातींमध्ये गरुड मी आहे हे जाण, म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो.
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌻पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥ ३१॥*
अर्थ 👉 _वेगवान वस्तूमधे वायू मी आहे, शस्त्रधार्‍यांमधे राम मी आहे, मत्स्यांमधे मकर मी आहे, नद्यांमधे भागीरथी मी आहे._
➖➖➖➖🚩➖➖➖
*🌷पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा । एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा करी जो ॥२५०॥*
    एका उड्डाणासरसे साताही सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत,
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
🍂  *ओवी  २५१ पासून उद्या*
🍀  *|जयजय रामकृष्ण हरि |*

0Shares
error: Content is protected !!